शहरातील पाणी कपातीचा निर्णय मागे घ्या!

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेने तुर्भे, ऐरोली, नेरुळ, घणसोली, सीबीडी बेलापूर, कोपरखैरणे व वाशी या सात विभागामध्ये आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय एका परिपत्रकान्वये घेतला आहे. दरम्यान, शहरात चालु वर्षी भरपूर प्रमाणात इतर वर्षाच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली असतांना महापालिकेने पाणी कपातीच्या घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेला पाणी कपातीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे. 

नवी मुंबई महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांना या मागणीचे निवेदन देते वेळी शहरप्रमुख विजय माने यांच्यासह उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर उपशहरप्रमुख गणपत शेलार, माजी नगरसेवक काशिनाथ पवार, सुमित्र कडू, नीलकंठ म्हात्रे, विभाग प्रमुख संजय भोसले, माजी नगरसेवक विशाल ससाने, उपविभाग प्रमुख तुर्भे राजेश पाटील, प्रल्हाद पाटील,शाखाप्रमुख संदीप पाटील, युवासेना उपविभागीय अधिकारी अजय सागवेकर, उपशाखाप्रमुख धनंजय औटी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.