पनवेल (वार्ताहर) - शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे निराधार महिलेस दुकान सुरू करण्यासाठी सामान भरून देऊन शिवजयंती उत्सवानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून महिलेस रोजगार मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पनवेल शहर शाखाप्रमुख अभिजित साखरे यांनी पुढाकार घेतला होता.
सदर महिला ही नवनाथ झोपडपट्टी परिसरात राहते, तिचे पती मिलिंद सातवे यांचे निधन झाल्यामुळे परिस्थिती हालाकीची बनली होती, शाखाप्रमुख अभिजित साखरे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी शिवजन्माचे औचित्य साधून त्यांना छोटे खानी दुकानासाठी अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांचे समान शिवसेना पनवेल शहर शाखेत सुपूर्द करून रोजगाराचे साधन निर्माण करुन दिले आहे.